Talegaon Dabhade News : सरस्वती विद्या मंदिरच्या दोन विद्यार्थिनींना राष्ट्रीय शिष्यवृत्ती; संस्थेच्या नावलौकिकात भर

एमपीसी न्यूज – सरस्वती विद्या मंदिरच्या दोन विद्यार्थिनींना ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती’ (एनएमएमएस) ही राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती मिळाली आहे. इयत्ता आठवी मध्ये शिकणा-या अनुजा संतोष ठुबे व गीता संजय वायबसे अशी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. दोन्ही विद्यार्थिनींचे बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शासनाकडून त्यांना दरवर्षी बारा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यामुळे संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे.

सहा एप्रिल 2019 रोजी  ‘आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती’  (NMMS)  ही राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा शासनाने  घेतली. या परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर च्या  कु अनुजा संतोष ठुबे  व  कु गीता संजय वायबसे या  8 वी इयत्तेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून दरवर्षी बारा हजार रुपये याप्रमाणे त्यांना बारावीपर्यंत शिक्षणासाठी शासनातर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्था अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्यवाह  प्रमोद देशक, सदस्य  विश्वास देशपांडे, मुख्याध्यापिका  रेखा परदेशी,पर्यवेक्षक सुरेखा रासकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे व त्यांच्या पालकांचे त्याच प्रमाणे या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे सर्व विषय शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.

 covid-19 अंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.