Chinchwad : टेम्पोत ठेवलेल्या भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्याला आग

एमपीसी न्यूज – इलेक्ट्रॉनिक साहित्य भरलेल्या टेम्पोला अचानक आग लागली ही भंगार इलेक्ट्रॉनिक साहित्य ठेवले होते. या साहित्याला अचानक आग लागली. ही घटना आज (सोमवारी) दुपारी बाराच्या सुमारास चिंचवड मधील मोहननगर येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक भंगार साहित्य भरून एक आयशर टेम्पो (एम एच 14 / जी डी 0847) मोहन नगर मधील स्पेको कंपनीजवळ उभा होता. अचानक बाराच्या सुमारास टेम्पोमध्ये ठेवलेल्या साहित्याला आग लागली. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. दीड तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले असून टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.