Pune News : धर्मातील तत्वांचे आचरण करावे : भगत सिंह कोश्यारी 

एमपीसी न्यूज : देशाच्या प्राचीन इतिहासात अनेक धर्मामध्ये उपदेश केले गेले आहे. मात्र हे उपदेश आचरणात आणत समाजाला दिशा देणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे राज्यपाल व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्रमुख डॉ. विमल बाफना यांच्या ‘उपासकदशा’ ( उवासगदसाओ सातवा आगमग्रंथाचे मराठी भाषांतर) या मराठी ग्रंथाचे प्रकाशन भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते विद्यापीठात करण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर, अखिल भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था व डॉ. विमल बाफना, डॉ. शैलेश गुजर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी विद्यापीठ मुद्राणालयतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्रंथ निर्मितीसाठी विशेष सत्कार करण्यात आला.

कोश्यारी म्हणाले, वेदांमध्ये फार वर्षांपूर्वी जी तत्व सांगितली आहे ती आजही कालसुसंगत आहे. लोकांना अपल्याश्या वाटणाऱ्या भाषेत त्याचे भाषांतर केल्याने ती अधिक चांगल्या रीतीने सामन्यातपर्यंत पोहोचतील.

यावेळी डॉ. विमल बाफना म्हणाल्या, दहा कथांच्या माध्यमातून उपासकांच्या कथा या ग्रंथात मांडल्या असून या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, रामयणापासून मोठं तत्वज्ञान सांगणारे अनेक ग्रंथ हे जैन साहित्यात आहेत, ज्याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.यावेळी शांतीलाल मुथ्था व डॉ. शैलेश गुजर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

विद्यापीठात सतरा अध्यासने असून प्रत्येक अध्यासन विशिष्ट धोरण घेऊन आपापल्या विषयात उत्कृष्ट काम करत आहे. या ग्रंथातून नक्कीच समाजाला दिशा देण्याचे कार्य घडेल.

– प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.