Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीग तब्बल दोन वर्षांनी पुन्हा सुरु ,बंगळुरू येथे होणार पहिला सामना

एमपीसी न्यूज : भारताच्या मातीतील खेळ असलेल्या कबड्डीचे वारे पुन्हा एकदा वाहू लागणार आहेत. कमी कालावधीत अत्यंत लोकप्रिय झालेली प्रो कबड्डी लीग तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला येत्या 22 डिसेंबरपासून बंगळुरू येथे सुरुवात होणार आहे.

करोनाचा धोका अद्याप कायम असल्यामुळे यंदाही प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्यास मनाई आहे. 2019 सालानंतर करोनाच्या धोक्‍यामुळे ही स्पर्धा घेण्यात आलेली नव्हती. आता सुरक्षेची सर्व काळजी घेऊन ही स्पर्धा सुरू होणार आहे.

या स्पर्धेचे सामने खेळवण्यासाठी आधी अहमदाबाद आणि जयपूर या शहरांचाही विचार करण्यात आला होता. मात्र, अखेर बंगळुरूला यजमानपद देण्यात आले.

करोनाबाबतच्या नियमांचे पालन करून बायोबबलच्या नियमांनुसार हे सामने खेळवले जाणार आहेत. यंदा या स्पर्धेत 12 संघ सहभागी होत असून गेल्या ऑगस्टमध्येच खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.