Pimpri : औद्योगिक कंपन्यांना पाणी बिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी – गजानन बाबर

एमपीसी न्यूज – देशात कोरोना या साथीचा आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे  व या अनुषंगाने देशात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा आणिबाणीच्या परिस्थितीत शहरातील औद्योगिक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत व सर्व कामकाज ठप्प असल्यामुळे औद्योगिक कंपन्यांना पाणी बिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या कडे पत्राद्वारे केलेल्या मागणीत बाबर म्हणतात, औद्योगिक विकास महामंडळ, पाणी वितरण विभागामार्फत औद्योगिक कारखान्यांना दर महिन्याला पाणी बिल दिले जाते तरी सध्या महाराष्ट्रातील सर्व कंपन्या लॉकडाऊन असल्यामुळे कंपनीतील सर्व कामकाज ठप्प आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांना पाणी बिल भरणे शक्य होणार नाही तरी ही परिस्थिती निवळे पर्यंत  पाणी बिल भरण्याची सक्ती महाराष्ट्रातील औद्योगिक कंपन्यांना करू नये तसेच त्यावर कुठल्याही प्रकारचे विलंब शुल्क लावू नये.

सध्या महाराष्ट्रातील सर्व औद्योगिक कंपन्या  कोरोना सारख्या साथीच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत आल्या आहेत त्यामुळे मेमहिन्याच्या अखेरपर्यंत किंवा परिस्थिती निवळे पर्यंत औद्योगिक कंपन्यांना पाणी बिल  भरण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.