Maval News : मिंडेवाडी येथील बाळा नगरकडे जाणारा रस्ता माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या स्वखर्चातून पूर्ण

एमपीसी न्यूज – मिंडेवाडी येथील बाळा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यामध्ये खूप दुरावस्था झाल्याने स्थानिक नागरिकांना दोन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे स्थानिकांनी सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्याकडे रस्ता करून देण्याची मागणी केली. सरपंच पडवळ यांनी स्वखर्चातून तेथील रस्त्याचे काम पूर्ण करून दिले.

या कामाचे भूमिपूजन तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाण, माजी सरपंच दत्तात्रय पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर अध्यक्ष अविनाश बधाले, युवा नेते शाम पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, फक्त निवडणुका आल्या की अनेक कार्यकर्ते इच्छुक होतात. परंतु सरपंच दत्तात्रय पडवळ हे पाचही वर्ष कायम समाजामध्ये धडपडत असतात आणि समाजाची कामे करत असतात. मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत असतो परंतु असा सरपंच मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहिला नाही. येत्या काळामध्ये निश्चितच आंदर मावळातील जनता तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहील असा विश्वास सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक गुलाब बधाले, रोहिदास बधाले, राजू बधाले, देविदास बधाले, सोमनाथ बधाले अनिल बधाले, अमित बधाले हे स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बधाले यांनी केले. युवानेते प्रेम बधाले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.