Vadgaon Maval : शिवराज ग्रुप आयोजित किल्ले बनवा स्पर्धा; स्पर्धकांना घडणार स्वराज्य राजधानीची सफर!

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील शिवराज ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचे यंदा दहावे वर्ष आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 150 स्पर्धकांना मोफत स्वराज्य राजधानी रायगडाची मोफत सफर घडणार आहे. रायगडावर या स्पर्धेचे बक्षीस वितरण केले जाणार आहे.

दिवाळीचे औचित्य साधून वडगाव मावळ मधील शिवराज ग्रुपने किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत 150 स्पर्धकांनी सहभाग घेत 40 किल्ले बनवले. अनिल कोद्रे, विवेक गुरव यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. संस्थापक अक्षय वायकर, अध्यक्ष बाळासाहेब तुमकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब ढोरे, उपाध्यक्ष सुहास विनोदे,
सचिव सतीश ढोरे, कार्यक्रम प्रमुख रोहित गिरमे, खजिनदार तुषार वहिले, सहसचिव सोनू पिंजण, सोनू लोंढे, प्रसिद्धीप्रमुख विश्वजीत गुरव, सहखजिनदार तुषार हुलावळे आदींनी या उपक्रमाचे आयोजन नियोजन केले आहे.

यापूर्वी सन 2012 किल्ले रायगड, सन 2013 किल्ले शिवनेरी, सन 2014 किल्ले प्रतापगड, सन 2015 किल्ले सिंहगड, सन 2016 किल्ले पन्हाळा, सन 2017 किल्ले अकलूज, छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू तुळापूर, सन 2018 अजिंक्यतारा सज्जनगड, सन 2019 तिकोणा, सन 2020 लोहगड किल्ल्यावर मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावर्षीही सहभागी स्पर्धकांना 13 नोव्हेंबर व 14 नोव्हेंबर हे दोन दिवस मोफत किल्ले रायगड सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षिस वितरण हे सालाबाद प्रमाणे किल्ल्यावरच करण्यात येणार आहे.

खुला गट –

  • प्रथम क्रमांक- रूपये 5000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांक- रूपये 3000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांक- रूपये 2000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र

लहान गट – (वय वर्षे 6 ते 16)

  • प्रथम क्रमांक- रूपये 3000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र
  • द्वितीय क्रमांक- रूपये 2000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र
  • तृतीय क्रमांक- रूपये 1000/- शिवप्रतिमा, प्रमाणपत्र

सहभागी सर्व स्पर्धकांना मोफत स्वराज्य राजधानी किल्ले रायगड दर्शन व सफर करण्याची संधी मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.