Pune : इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे पुढील तीन दिवस लोकलच्या दुपारच्या चार फेऱ्या रद्द

एमपीसी न्यूज –  इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे सोमवार (दि.26) ते बुधवार (दि.29) या कालावधीत दुपारच्या सत्रात लोणावळावरून पुणेला (Pune) जाणाऱ्या दोन लोकल व पुण्यावरून लोणावळाला जाणाऱ्या दोन लोकल अशा चार फेऱ्या रद्द कऱण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

Mahalunge : दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

त्यानुसार लोणावळा रेल्वे स्थानकावरून सकाळी 10.05 ची लोकल सुटल्यानंतर पुढची लोकल थेट 5.30 वाजता म्हणजे साडेसात तासांनी सुटणार आहे. लोणावळा स्थानकावरुन सुटणारी 2.50 व 3.30 या दोन लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच पुणे (Pune) स्थानकातून सुटणारी 9.57 व 11.17 वाजताच्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . सदरच्या गाड्या रद्द झाल्याने नागरिकांचे , शाळकरी मुले व कामगार वर्गाचे प्रचंड हाल होणार असल्याचे पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी ( भाईजान ) यांनी सांगितले. नागरिकांनी देखील याची नोंद घेत दुपारच्या वेळेत अन्य सार्वजनिक प्रवासी वाहनांनी प्रवास करत गैरसोय टाळावी, असे आवाहन कऱण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.