Attack on boy : किरकोळ कारणावरून 16 वर्षीय मुलावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – आम्हाला साईड का दिली नाही म्हणत 16 वर्षीय मुलाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.(Attack on boy) ही घटना रविवारी (दि. 9) रात्री आंबेडकर चौक, पिंपरी येथे घडली.

नागेश देवप्पा ईरमिट्टी (वय 16, रा. गांधीनगर, पिंपरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YCMH: ‘एआरटी सेंटर’ पीजी इन्स्टिट्यूटमार्फत चालविणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागेश आणि त्यांचा मित्र आदित्य सोनपाखरे असे ईद ए मिलादची मिरवणूक पाहण्यासाठी आंबेडकर चौक पिंपरी येथे गेले होते.(Attack on boy) मिरवणूक झाल्यांनतर ते घरी जात असताना तीन ते चार जणांनी त्यांना अडवले. जाताना आम्हाला साईड का दिली नाही, असे म्हणून एकाने नागेश यांच्यावर कोयत्याने वर केला. यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.