Pimpri : रोटरी डिस्ट्रिक्टतर्फे शिक्षकांसाठी आयटी कौशल्ये शिकवणारा मोफत ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स

Free online certificate course for teachers teaching IT skills by Rotary District.

एमपीसी न्यूज – ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना उपयुक्त असणाऱ्या डिजिटल व आयटी कौशल्ये शिकवणारा मोफत ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे करण्यात आले आहे. सोमवार पासून (दि.10) सुरू होणार्या या कोर्स मध्ये 15 विविध आयटी कौशल्ये शिकवली जाणार आहेत.

शिक्षकांना आयटी साधनांचा वापर करून ऑनलाइन अध्यापनासाठी उपयुक्त आयटी कौशल्ये शिकवणारा हा ऑनलाईन प्रमाणपत्र  अभ्यासक्रम आहे. शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या 15 महत्त्वपूर्ण आयटी कौशल्यांनी सुसज्ज करेल.

हा अभ्यासक्रम व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समार्फत राबविला जाणार असून अगदी मोफत असणार आहे.

या अभ्यासक्रमात सोप्या मराठी आणि इंग्रजी भाषेतून स्पष्ट केलेले आयटी कौशल्यांचे छोटे व्हिडिओ व त्यावर आधारीत प्रश्नांचा व्हिडीओ,  खास तयार केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांशी शेअर केले जातील.

पूर्ण दिवसभरात आपापल्या सोयीनुसार कधीही व कितीही वेळा शिक्षक ते व्हिडिओ पाहून  समजून घेऊ शकतात व उत्तरे पाठवू शकतात. त्यानंतरच्या दिवशी, नवीन कौशल्यांच्या व्हिडिओंसह, मागील दिवसाच्या प्रश्नांवरील उत्तरांचा व्हिडिओ देखील शेअर केला जाईल.

सलग पाच दिवस या अभ्यासक्रमात दररोज तीन नवीन कौशल्ये  शिकवली जाणार आहेत. सहाव्या दिवस सरावाचा तर कार्यक्रमाच्या सातव्या दिवशी, शिक्षकांनी ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या लिटरसी कमिटी तर्फे घेतले जाणारे हे प्रशिक्षण खास शिक्षकांसाठी आहे.

सोमवार (दि.10) पासून प्रशिक्षण रविवार (दि.16) पर्यंत सुरू राहील. त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या ई-मेल वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.

निःशुल्क असणाऱ्या या  प्रशिक्षणाचा शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी यांनी केले आहे.

इच्छुकांना या लिंकवर जाऊन नोंदणी करावी:

https://rebrand.ly/registration-marathi-paper

अथवा 95118 89820 या व्हॉट्सऍप नंबरवर आपली माहिती पाठवावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.