Maval News : शायनल इंटरप्रायजेसतर्फे रामदास काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयास 1 लाख रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज – मावळ येथील प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त शायनल इंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा व उद्योजक विशाल लोखंडे आणि महेश निंबाळकर यांच्याद्वारे इंद्रायणी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी 1 लाख रुपये निधी चेक स्वरूपात माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आलाव युवा उद्योजकांचाही गुणगौरव करण्यात आला.याप्रसंगी बोलताना रामदास आप्पा म्हणाले, “महेश निंबाळकर व विशाल लोखंडे हे तरुण मावळ तालुक्यात अल्पावधी काळात यशस्वी उद्योजक झालेले आहेत व ते चांगल्या दिशेने वाटचाल करत सामाजिक बांधिलकीही जपत आहेत अशा युवा उद्योजकांची समजला गरज आहे” अशा शब्दात त्यांचे कौतुक केले.

विशाल लोखंडे व महेश निंबाळकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तळेगाव, चाकण, उर्से, कान्हे व राज्याबाहेरील गुजरात येथे देखील औद्योगिक क्षेत्रामध्ये मॅनपॉवर सर्विसेस क्षेत्रात उल्लेखनीय कामे केलेली आहेत आणि 1 हजारांच्यावर तरुणांच्या हाताला कामे मिळवून दिलेली आहेत अशा शब्दात रामदास काकडे यांनी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली.

तसेच, शायनल इंटरप्रायजेस चे मुख्य विशाल लोखंडे यांनी त्यांचे उद्दिष्ट्य हे बेरोजगारांना रोजगार मिळून देण्याचं असून लवकरच 10 हजार हातांना काम मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन केले व पूर्ण भारतभर काम पसरिवणार असल्याचे सांगितले.

यावेळी कार्यक्रमास मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे, शैलेश शहा चंद्रकांत शेटे,गोरख काळोखे, संतोश खांडगे, गणेश खांडगे, गणेश भेगडे, संदीप काकडे, युवराज काकडे, मिलिंद अच्युत, विलास काळोखे, विकी नवघने र्आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.