Gahunje :गहुंजे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी विशेष पीएमपीएमएल बस

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 (Gahunje) स्पर्धेचे 5 सामने होणार आहेत.या स्पर्धेला जाण्याऱ्या क्रिकेटप्रेमींची गैरसोय होऊ नये यासाठी पीएमपीएमएल तर्फे विशेष बस सुविधा पुरविण्यात येणार आहे.

सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. त्यास अनुसरून पीएमपीएमएल कडून (Gahunje)गहूंजे स्टेडियम साठी पीएमपीएमएल कडून पुणे मनपा भवन, कात्रज व निगडी टिळक चौक बस स्थानक या तीन ठिकाणांहून बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच क्रिकेट शौकिनांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार तीनही बसस्थानकांवरून जादा बसेसचे नियोजन करण्यात येईल असे ही पीएमीएमएल तर्फे सांगण्यात आले आहे.

Charholi : वाघेश्वर मंदिर परिसरात होणार ‘परंपरा-संस्कृती जतन’

या बस सुविधेचा तपशील खालील प्रमाणे (19 व 30 ऑक्टोबर ,1 व 8 नोव्हेंबर)

1) पुणे मनपा भवन बस स्थानक – सकाळी 11वा.,सकाळी 11वाजून 35 वा. दुपारी 12 वाजून 5 मिनिटे ( तिकीट दर जाताना व येताना व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रूपये)

2) कात्रज बायपास बस स्थानक – सकाळी 11 वा.,
सकाळी 11.30 वा (जाताना व येताना प्रत्येक तिकिट दर व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रूपये)

3) निगडी टिळक चौक बस स्थानक दुपारी 12 वा.,दुपारी 12.30 वा.(जाताना व येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रूपये)

11 नोव्हेंबर चे बस नियोजन

1) पुणे मनपा भवन बस स्थानक सकाळी 8.25 वा.,सकाळी 8.50 वा.सकाळी 9.05 वा.(जाताना व येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रूपये)

2) कात्रज बायपास बस स्थानक सकाळी 8.15 वा.,सकाळी 8.35 वा.(जाताना व येताना प्रत्येक माव्यक्तीसाठी प्रत्येकी 100 रूपये)

3) निगडी टिळक चौक बस स्थानक- सकाळी 8.30 वा.,
सकाळी 9 वा.(जाताना व येताना प्रत्येक व्यक्तीसाठी प्रत्येकी 50 रूपये)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.