आपल्या स्वप्नातील घरकुल प्रत्यक्ष साकारण्यासाठी कटिबद्ध, श्रीनाथ डेव्हलपर्सचा इंद्रायणी व्हिला गृहप्रकल्प

एक ते अकरा गुंठ्यांचे निसर्गरम्य प्लॉटसचा इंद्रायणी व्हिला प्रकल्प

एमपीसी न्यूज- आपल्या स्वप्नातील घरासाठी जागा हवी आहे, मग ती घेण्यासाठी भेट द्या श्रीनाथ डेव्हलपर्स यांच्या इंद्रायणी व्हिला या निसर्गरम्य प्रकल्पाला. आळंदी येथील मरकळ रोडवर एक गुंठ्यापासून ११ गुंठ्यापर्यंतच तयार प्लॉट येथे अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका व आळंदी नगरपरिषदेच्या म्हणजेच नियोजित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत, एमआयडीसीपासून अगदी जवळ आणि निसर्गरम्य ठिकाणी आपल्या स्वप्नातील घरकुल बांधण्यासाठी सर्व नागरी सोयींनी युक्त असे सुंदर व भव्य प्लॉट लगेचच राहण्यासाठी इंद्रायणी व्हिला येथे उपलब्ध आहेत.

आपल्या घराच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. कोणाला प्रशस्त घर हवे असते. तर कोणाला छोटेसे, टुमदार घर हवे असते. मात्र सध्याच्या फ्लॅटसंस्कृतीच्या काळात आपले एक स्वतंत्र घर असावे ही प्रत्येकाची मनोमन इच्छा असते. त्यामुळे लोकांच्या याच भावना ओळखून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील घरकुल साकारण्यासाठी श्रीनाथ डेव्हलपर्सतर्फे इंद्रायणी व्हिला ही प्लॉटची योजना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेत एक गुंठ्यापासून अकरा गुंठ्यांचे आपल्या गरजेनुसार प्लॉट उपलब्ध आहेत.

या प्रकल्पाची इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. येथे प्रशस्त रस्ते आहेत. चोवीस तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आहे व पाण्याचे प्रत्येकाला वैयक्तिक कनेक्शन आहे. तसेच चोवीस तास वीज देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्वतंत्र ड्रेनेज लाईन, अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे आदी आवश्यक त्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. येथून पुणे विपश्यना केंद्र, श्री श्री रवीशंकर आश्रमदेखील जवळ आहे. त्यामुळे ज्यांना या क्षेत्राची आवड आहे त्यांच्यासाठी ही एक अत्यंत उत्तम संधी आहे. मरकळ येथील इंग्लिश मिडीयम स्कूलसुद्धा येथून जवळच आहे. त्यामुळे आपल्या पाल्याच्या उत्तम शिक्षणाची आपल्याला काहीच काळजी करण्याची गरज नाही. येथून लोहगाव विमानतळ व पीएमपीएमएलचा बसस्टॉपदेखील जवळ आहे. पुण्याच्या नियोजित रिंगरोडपासून फक्त दोन किमी अंतरावर ही योजना असून येथे मेट्रोदेखील मंजूर झालेली आहे. तसेच निसर्गरम्य लोकेशन असल्याने इंद्रायणी नदीचे सान्निध्य आपल्याला प्रसन्न करेल यात शंका नाही. प्रत्येक प्लॉटसाठी स्वतंत्र डिमार्केशन असून प्लॉटला लागून लोकवस्ती आहे, त्यामुळे येथील निवास हा सुरक्षित आहे.

येथे बुकींग करणा-यांसाठी अत्यंत किफायतशीर अशा योजना उपलब्ध आहेत. फक्त नऊ हजार रुपये भरुन आपण बुकींग करु शकता. तसेच आपल्यास हप्त्याने प्लॉट खरेदी करायचा असल्यास तीदेखील सोय येथे आहे. त्वरीत खरेदी करणा-यास बुकींगची रक्कम 9000, खरेदीखताच्यावेळी सहा लाख नव्वद हजार असे एकूण 6,99,000 भरायचे आहेत. तर ज्यांना हप्त्याने खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी बुकींगची रक्कम 9000, खरेदीखताच्या वेळी 5,00,000 व 16,000 रुपयांचे 15 हप्ते असे 2,42,000म्हणजे एकूण 7,51,000 रुपये भरायचे आहेत. याशिवाय आपल्या ओळखीचा दुसरा ग्राहक असेल तर प्रती गुंठा 11,000 रुपये रोख अशी घसघशीत सूट देण्यात येईल. ऑफिसपासून साईट व्हिजीटची सोय आहे. कागदपत्रांचा खर्च प्लॉटधारकाने करायचा आहे.

ऑफिसचा पत्ता – श्रीनाथ डेव्हलपर्स,
आळंदी मरकळ रोड, सुयश मंगल कार्यालयासमोर, आळंदी देवाची, ता. खेड. जि. पुणे
फोन नं. – 9146015599, 9146085599

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.