दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रकल्प भामा कन्स्ट्रक्शनचा स्वदेस गृहप्रकल्प

एमपीसी न्यूज- बांधकाम क्षेत्रातील विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे भामा कन्स्ट्रक्शन कंपनी हे होय. मात्र हे काही एका रात्रीत शक्य झालेले नाही. यापाठीमागे शिवाजीराव भागवत यांचे अपार कष्ट आणि मेहनत कारणीभूत आहे. त्यांची दूरदृष्टीदेखील यासाठी खूप महत्वाची ठरली आहे. बांधकाम क्षेत्रात नाव कमवणे ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण प्रत्येकाचे घराचे असे सुंदर स्वप्न असते. प्रत्येकाच्या घरासंबंधीच्या काही हळव्या आठवणी असतात. त्या सर्व पूर्ण करणे हे खूप कठीण असते. तसेच या सर्व गोष्टींमध्ये अनेक बाबींचा समन्वय साधावा लागतो. तेव्हा कुठे कोणताही गृहप्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकतो. आणि यासाठी महत्वाची ठरते ती प्रकल्प व्यावसायिकाची दूरदृष्टी, नियोजन आणि अनुभव.

या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करुन शिवाजीराव भागवत यांनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येक प्रकल्पात विविध वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. त्यांनी त्यांच्या प्रत्येक प्रकल्पात गुणवत्ता राखली आहे. त्यामुळे भामा कन्स्ट्रक्शन कंपनीने आपला प्रत्येक प्रकल्प दर्जेदार कसा होईल याकडे बारकाईने लक्ष दिले आहे. दर्जेदार सेवा पुरवणे बांधकाम क्षेत्रातील यशस्वी कंपनीचे मुख्य भांडवल असते. या बाबीकडे भामा कन्स्ट्रक्शन कंपनीने विशेष लक्ष दिले असून ग्राहकांचे समाधान हेच आमचे ब्रीद हे त्यांनी सर्वार्थाने खरे करुन दाखवले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील यशाची नवनवीन शिखरे त्यांनी अल्पावधीतच काबीज केली आहेत. ज्या सेवा पुरवण्याचे त्यांनी ग्राहकांना कबूल केलेले असते ते त्या देतातच. ग्राहकांची स्वप्ने पूर्णत्वाला नेण्याचा वसा भामा कन्स्ट्रक्शनतर्फे घेतलेला आहे. तसेच जे देतात ते सर्वोत्तम असण्याचा त्यांचा अट्टहास असतो.

आपल्या ग्राहकाची छोट्यात छोटी गरज उत्तम प्रकारे कशी पूर्णत्वाला नेता येईल याचा आटोकाट प्रयत्न कंपनीकडून केला जातो. त्याचबरोबर ग्राहकाला जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध करुन देता येतील याकडे त्यांचे संपूर्ण लक्ष असते. आणि या सगळ्याचा सारासार विचार करुनच घरांची निर्मिती केली जाते. त्यांची संरचना ही त्यात राहणा-या व्यक्तीच्या सुखसुविधा जपणारी असते. पूर्णपणे व्यावसायिक असणा-या या जगात भामा कन्स्ट्रक्शन कंपनी मात्र जिव्हाळा जपण्यास जास्त महत्व देते. किंबहुना जिव्हाळा जपणे हे त्यांचे प्राधान्य असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच माझं घर माझा प्रदेश हे या कंपनीचे या प्रकल्पाचे ब्रीदवाक्य आहे.

भामा कन्स्ट्रक्शनतर्फे कान्हेफाटा येथे स्वदेस हा आधुनिक सोयींनी सुसज्ज असा गृहप्रकल्प सुरु असून त्या प्रकल्पात कंपनीने सर्वांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करुन दिली आहेत. येथे प्रदूषणमुक्त वातावरणात एक आणि दोन बीएचके अशी सर्व सोयींनी सुसज्ज अशी आधुनिक जीवनशैलीला अनुसरुन अशा प्रकारे निर्माण करण्यात आलेली घरे आहेत. सारथी ग्रुपच्या तर्फे बांधण्यात आलेल्या या घरांच्या मागे पुण्यातील काही नामवंत प्रकल्पांचा अनुभव गाठीशी आहे. येथील घरे ही आजच्या धकाधकीच्या जीवनात देखील तुम्हाला आनंद देऊन जाणारी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.