BNR-HDR-TOP-Mobile

Dighi : खोटे शिक्षण सांगून लग्न करणाऱ्यावर गुन्हा;विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- शिक्षण नसतानाही उच्चशिक्षित असल्याचे सांगून लग्न केले. त्यानंतर हुंड्यावरून विवाहितेचा छळ केल्याने तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुरुवारी (दि.४) पतीसह सासरच्यांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या प्रकरणी एका २६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पती प्रथमेश दत्तात्रय पाटील, सासरा दत्तात्रय पाटील, संगीता पाटील (सर्व रा. दिघी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व आरोपी पती यांचे लग्न ठरवत असताना तो डिप्लोमा मॅकेनिकल व अभियंता असल्याचे खोटे सांगण्यात आले. तसेच लग्नानंतर फिर्यादीला लग्नात सोन्याचा बांगड्या केल्या नाहीत का ? अशी विचारणा करत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच गाडी घेण्यासाठी माहेरून ५० हजार घेऊन ये म्हणत शारीरिक मानसिक त्रास दिला.
या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे सासरच्यांनी आपापसात संगनमत करून तिला माहेरी हाकलून दिले. उपनिरीक्षक पौर्णिमा कदम अधिक तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like