Bhosari News : तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – कंपनीत काम करत असताना तरुणाने एका महिलेला शिवीगाळ केली. त्या कारणावरून महिलेच्या पतीने तरुणाचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे आरोप करत त्याला मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. याबाबत एकास अटक करण्यात आली आहे. हा प्रकार रविवारी (दि. 6) रात्री सात वाजताच्या सुमारास भोसरी येथे घडला.

धनंजय गजानन भालेराव (वय 26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गजानन बाबन भालेराव (वय 57, रा. महाराष्ट्र चौक, भोसरी. मूळ रा. बुलढाणा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बडेसाहब हुसेनसाब शेख (वय 50, रा. खंडोबा माळ, भोसरी. मूळ रा. लातूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मुलगा धनंजय हा भोसरी परिसरातील एम्फेनाॅल कंपनीत काम करत होता. कंपनीत काम करत असताना आरोपी बडेसाहब यांची पत्नी लियाकतबी शेख यांना शिवीगाळ केली. या कारणावरून बडेसाहब याने धनंजय याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत असे खोटे आरोप केले.

तसेच धनंजयला दोन मोबाइल क्रमांकावरून फोन करून कंपनीच्या बाहेर आल्यावर हात पाय तोडतो अशी धमकी दिली. घाबरलेल्या धनंजयने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी बडेसाहब याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.