Sangvi News : पादचारी तरुणीचा 80 हजारांचा मोबाईल फोन हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना तरुणीचा एका दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी 80 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना रविवारी (दि. 6) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फेमस चौक येथील वंदन स्विटच्या परिसरात नवी सांगवी येथे घडली.

शलाका संजय बनकर (वय 22, रा. आदर्शनगर, नवी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका लाल रंगाच्या दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी फेमस चौक येथील वंदना स्विटच्या परिसरातून रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी एका लाल रंगाच्या दुचाकीवरून दोन चोरटे आले. त्यांनी फिर्यादी यांच्या हातातील 80 हजार रुपये किमतीचा अॅप्पल कंपनीचा मोबाइल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.