Pimpri News: जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर, एक्स-रे मशीन भेट

एमपीसी न्यूज – कै. सुमन बाळकृष्ण वाघेरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी म्हणून माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयास डेंटल चेअर व एक्स-रे मशीन ही उपकरणे भेट दिली आहेत.

कार्यक्रमास वैद्यकीय विभागप्रमुख डॉ.लक्ष्मण गोफणे, माजी नगरसेवक विनोद नढे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. सुनिता साळवे, डॉ.अल्वी नासेर, सामाजिक कार्यकर्ते संतोष हांडे, राजेंद्र वाघेरे, राकेश मोरे, सिस्टर इन्चार्ज किरण गायकवाड, माधुरी चारिया, मीना संकपाळ आदी उपस्थित होते.

Nagnath Kottapalle: पिंपरी चिंचवड शहराचे भूषण थोर साहित्यिक ‘डॉ. नागनाथ कोत्तापल्ले’

महापालिकेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा बळकट करणे हा या उपक्रमाचा मुळ उद्देश आहे. पिंपरी परिसरातील नागरिकांना दंतरोग उपचार करणेकामी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयांमध्ये अथवा खासगी रुग्णालयामध्ये जावे लागत होते. नागरिकांना दंतरोग उपचार सुलभरित्या मिळणेकामी आणि भविष्यात रुग्णांना सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये चांगल्या सुविधा देणेकामी ही मशिन भेट दिली असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत शहरातील सर्वच नागरिकांना योग्य वैद्यकीय सुविधाचा लाभ मिळण्याबाबत प्रयत्न केला जात असतो. महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा देत असताना कोणीतरी आपल्या मार्गावर सतत आपल्याला मदतीचा हात देत रुग्णसेवेचा मार्ग सुखकर व आनंददायी करण्याचा प्रयत्न करीत असते. ती व्यक्ती म्हणजेच संदीप वाघेरे आहेत. कोरोना महामारीच्या काळामध्ये देखील जिजामाता रुग्णालयास अशाच पद्धतीने त्यांनी उपकरणे दान केली होती. तसेच म्युकर मायकोसीस या गंभीर आजारासाठी देखील वायसीएम रुग्णालयास उपकरणे भेट दिली होती. या दान केलेल्या उपकरणांमुळे नागरिकांना उपचार घेण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.