Gold-Silver Price Today in Pune : सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा, पाहा सोन्याची आजची किंमत

एमपीसी न्यूज : गेल्या अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण होताना दिसली आहे. (Gold-Silver Price Today in Pune) पुण्यातील सोन्याच्या दरात मंगळवारी दिवसभरात मोठी वाढ झाली होती. पुण्यात काल (5 एप्रिल) दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 62700 तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 60, 700 रुपये प्रती तोळा इतका होता.पुण्यात आज (6 एप्रिल) 24 कॅरेट सोन्याचा प्रतीतोळा दर 62,460 तर 23 कॅरेट सोन्याचा भाव 60,580 रुपये प्रती तोळा इतका आहे.

पुण्यात आज सोन्याचा भाव 24 कॅरेट 10 ग्रॅम ला ₹62,460 एवढा असून काल पासून ₹240 नी कमी झाले आहे. काल हाच भाव ₹62,700 एवढा होता. आज, 23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला ₹60,580 एवढा असून काल पेक्षा ₹190 नी कमी झालेआहे. काल हाच भाव ₹60,770 एवढा होता.

Pimpri : संघटनात्मक काम प्रभावीपणे करणार; भाजपच्या स्थापनादिनी शहराध्यक्षांचा निर्धार

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹57,840 एवढा असून काल पेक्षा ₹190 नी कमी झाल्याचे दिसून येते काल 22 कॅरेट सोन्याचा भाव₹58,030 एवढा होता. तर चांदीचा भाव मात्र ₹1000 नी घसरल्याचे  दिसून येते, पुणे शहरातील आजचा चांदीचा दर 73000 रुपये प्रती किलो इतका आहे आज 1 कलो चांदी चा भाव ₹77,000 एवढा आहे. काल चांदी चा भाव 1 किलो ला ₹78,000 एवढा होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.