Khadakwasala Dam : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, धरणसाखळीतील पाणीसाठा तीन टीएमसी वर

एमपीसी न्यूज – यंदा पाऊस लांबल्याने पुणे शहरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून पुण्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील बारा तासात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला  (Khadakwasala Dam) या चारही धरणात एकूण 2.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. 

या चारही धरणातील पाणीसाठा 2.51 टीएमसी इतका खाली आला होता. मात्र मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. याशिवाय सोमवारी रात्री देखील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या चारही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या चारही धरणात एकूण 2.96 टीएमसी इतका पाणीसाठा झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Pavana Dam : पाणीकपात टळणार, धरण परिसरात पावसाचा जोर वाढला

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार खडकवासला 19 मिमी  (Khadakwasala Dam) , वरसगाव 53 मिमी, टेमघर 66 मिमी तर पानशेत 50 मिमी इतक्या पावसाची नोंद मागील 24 तासात झाली आहे. याशिवाय या चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.