PI Transfer : अवैध धंदे सुरू असल्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची बदली

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्तांनी इशारा देऊनही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मटका जुगार यासारखे अवैध धंदे सुरूच असल्याने समर्थ पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची (PI Transfer)  अखेर बदली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांची गुन्हे शाखेत पोलीस कल्याण पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर विशेष शाखेतील रमेश साठे यांची नियुक्ती करण्यात आली. 

Khadakwasala Dam : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, धरणसाखळीतील पाणीसाठा तीन टीएमसी वर

समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मंगळवार पेठ येथील अण्णा कुंभार याच्या आलिशान मटका आणि जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली होती. या कारवाईत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर 36 जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध धंदे सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

Pune Murder News: अल्पवयीन तरुणीचा दगडाने ठेचून खून? पोलीस चौकीपासून काही अंतरावर आढळला मृतदेह

याशिवाय वानवडीचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची देखील बदली (PI Transfer)  करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे यांची त्यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली. तर गलांडे यांच्याकडे सहाय्यक आयुक्त प्रशासनाचा पदभार देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.