Pune Murder News: अल्पवयीन तरुणीचा दगडाने ठेचून खून? पोलीस चौकीपासून काही अंतरावर आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 16 ते 17 वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृणरित्या हत्या (Pune Murder News) करण्यात आली. थेऊर येथील एका मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला. थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत मुलीची ओळख मात्र अद्याप पटली नाही. 

याप्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास काही नागरिकांना थेऊर पोलीस चौकीपासून काही अंतरावर असणाऱ्या मोकळ्या जागेत मुलीचा मृतदेह (Pune Murder News) आढळला. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली.

 

Pavana Dam : पाणीकपात टळणार, धरण परिसरात पावसाचा जोर वाढला

माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांसोबतच डॉग्स स्कॉड ही दाखल झाले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

दरम्यान मृत तरुणी ही अंदाजे 16 ते 17 वयोगटातील आहे. अज्ञात आरोपींनी अतिशय निर्घृणपणे तिचा खून केल्याचे दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर दगडाने वार केल्याच्या देखील खुणा दिसत आहेत. पोलीस या तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

Vice President Election 2022 : आजपासून उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरु, कशी असते मतदान प्रक्रिया?

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.