Chinchwad News : तत्कालीन राज्यपालांनी ‘ते’ पत्र प्रसिद्ध करावे – अजित पवार

एमपीसी न्यूज – राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडी सरकारने पत्राद्वारे आपल्याला 15 दिवसांच्या आत या आमदारांची नियुक्ती करावी, असे सांगितले होते, याचा राग आल्यानेच 12 आमदारांची यादी लटकवली, (Chinchwad News) असा आरोप माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचे पत्र प्रसिद्ध करावे. पत्राचा अर्थ काय निघतोय ते लोकांनाही कळेल असे म्हटले आहे.

पहाटेचा शपथविधी होऊन तीन वर्षे झाली आहेत. ज्या गोष्टीला हजार दिवस उलटून गेले आहेत, ते आता काढून काय उपयोग आहे का ? तेच तेच उगाळत बसण्यात काय अर्थ आहे. नागपूर अधिवेशनात चार ते पाच जणांची भ्रष्टाचाराची प्रकरणे काढली होती.

Pimpri News : सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात लवकरच बैठक – देवेंद्र फडणवीस

तेवढ्यापुरूती ती लावून धरली. त्यानंतर ते सरळ सांगतात असे काही झालेले नाही. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी (Chinchwad News) भाजपकडून नवीन मुद्दे उकरून काढले जातात. जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी चाललेला हा भाजपचा केवीलवाणा प्रयत्न आहे, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.