Graduate and Teacher Constituency Elections : महाविकास आघाडीचा विजय म्हणजे आमच्या कामाची पोचपावती : राज्यमंत्री विश्वजीत कदम

एमपीसी न्यूज : राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सहापैकी पाच जागांवर बहुमताने महाविकास आघाडीचा विजय झाला. हा ऐतिहासीक विजय म्हणजे सुज्ञ सुशिक्षीत मतदारांनी आमच्या कामाची पोचपावती आहे, असे मत राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले.

काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यमंत्री कदम पुढे म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारला वर्षपुर्ती झाली. आज राज्यातील सहा विधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचा ऐतिहासीक विजय झाला.

_MPC_DIR_MPU_II

शिवसैनिकांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तन-मन-धनाने अहोरात्र काम केले. त्यामुळे भाजपाचा पराभव करू शकलो. गेल्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपाने पदवीधर-शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सुज्ञ, सुशिक्षीत मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान करून त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकेट्याने लढा, असे आव्हान केले आहे. या प्रश्नावर कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हेच यावरचे उत्तर आहे.

वर्षभरात हे सरकार पडेल, अशी अफवा परसरवली जात होती. पण हे सरकार टिकले. विजयाकडे वाटचाल करत आहे, त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देणं गरजेचं वाटत नाही, अशी खिल्ली कदम यांनी उडवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.