BNR-HDR-TOP-Mobile

Maval : मावळच्या विकासासाठी भरीव तरतूद करावी – आमदार शेळके यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

0

एमपीसी न्यूज – मावळच्या ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार असून यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे भरीव तरतुदींची मागणी केली आहे.

ग्रामविकास विभागामार्फत मावळमधील ग्रामीण भागातील सर्वसमावेशक विकासकामांना गती मिळावी, यासह विविध मागण्यांचा प्रस्ताव आमदार शेळके यांनी ग्रामविकासमंत्र्यांकडे नुकतेच सादर केले. मावळ तालुक्यातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या विकासकामांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
प्रामुख्याने गावातील शाळा दुरुस्ती तसेच ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारे, पथदिवे, सभा मंडप, स्मशान भूमी सुधारणा, निवारा शेड, इ. कामे होणे गरजेचे आहे.

सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात व गावे स्वच्छ, सुंदर व स्वयंपूर्ण व्हावीत. यासाठी मावळ तालुक्यासाठी भरीव तरतूद करून द्यावी, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार शेळके यांनी करून त्यासंदर्भातील प्रस्ताव दिले आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like