Gwalior-Daund Superfast Express : ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेसला तळेगाव स्टेशन जवळ आग, सुदैवाने दुर्घटना टळली

एमपीसी न्यूज – ट्रेन क्रमांक 22194, ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट ( Gwalior-Daund Superfast Express ) एक्स्प्रेसला तळेगाव आग लागल्याची दुर्घटना रविवारी (दि.3) घडली.  काहीकाळ भितीचे वातावरण पसरल्याने काही प्रवाश्यांनी गाडी मधून उड्या घेतल्या.यात कोणीही जखमी झाले नाही.

Akurdi : आकुर्डी रेल्वे स्थानकावरही ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’

शेखर कुमार या X (ट्विटर) वापरकर्त्याने या घटनेबद्दल माहिती ट्वीट केले.त्याने लिहिले की, “ट्रेन 22194 सुशासन एक्सप्रेसला तळेगाव पुणे स्टेशनजवळ आग लागली. प्रवासी घाबरले आणि त्यांनी गाडीतून उड्या मारत स्वतःची सुटका करून घेतली.

या ट्वीटला त्वरीत प्रतिसाद देत रेल्वे प्रशासनाने परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून रात्री 8.01 वाजता RPF पुणे कडून पुढील तपशील समोर आला, ग्वाल्हेर-दौंड सुपरफास्ट एक्स्प्रेस दुपारी 4.36 च्या सुमारास तळेगाव स्टेशनवर थांबली होती, ब्रेक बाइंडिंगमुळे मागील SLR

(NC205707/C) मधून धूर निघत असल्याची माहिती मिळाली. रेल्वे कर्मचार्यांच्या प्रयत्नांमुळे 4.55 वाजता आग विझवण्यात आली, ब्रेक प्रेशर सोडले व दुरुस्ती करून गाडी मार्गस्थ करण्यात ( Gwalior-Daund Superfast Express ) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.