Hadapsar : हडपसरमधील कचऱ्याची समस्या सोडविणार- वसंत मोरे

पदयात्रा काढून नागरिकांशी साधला संवाद : प्रचंड मतांनी विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार

एमपीसी न्यूज – संपूर्ण पुणे शहराचा कचरा हडपसर, रामटेकडीत आणून टाकला जातो. त्यामुळे नागरिकांचा आरोग्यावर परिणाम होत आहे. याकडे भाजप – राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले. पुणे शहराच्या चारही बाजूंनी कचरा जिरविण्यात यावा, यासाठी आपण सातत्याने महापालिका सर्वसाधारण सभेत आवाज उठविला. कचऱ्याची समस्या आपण सोडविणार असल्याचे आश्वासन मनसेचे हडपसर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांनी दिले.

हडपसर परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. एसआरएचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीत विरोधक केवळ आरोप प्रत्यारोप करीत आहे. त्यांच्याकडे हडपसरचा विकासाचे कोणतेही नियोजन नाही. केवळ मनसेच सर्वांगीण सुंदर हडपसर निर्माण करू शकते, त्यासाठी येत्या निवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी, करा असे आवाहन वसंत मोरे यांनी नागरिकांना केले.

रामटेकडी, वैदूवाडी परिसरात वसंत मोरे यांची आज पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. ‘कोण म्हणते येणार नाही, आल्याशिवाय राहणार नाही’, ‘इकडून आले, तिकडून आले, मनसेचे इंजिन आले’ आशा घोषणा देऊन परिसर दुमदुमला होता. यावेळी सतीश शिंदे, दीपक शिंदे, दीपक पवार, सोमनाथ नाळे, बलराम मिरेकर, विवेक शिंदे उपस्थित होते.

अक्षय नरवडे, अमर लोणकर, अमोल पवडे, दिलीप खाडे, अक्षय चव्हाण यांनी मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. तर, मूळचा कात्रज येथे राहणारा आणि आता ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेल्या संतोषने वसंत मोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. रामटेकडी भागाचा विकास केवळ मनसेच करू शकते, असा विश्वास संतोष चव्हाण यांनी व्यक्त केला. कात्रज भागात वसंत मोरे यांनी अनेक विकासकामे केली, त्यामुळे त्यांचाच विजय निश्चित असल्याचे कैलास पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.