Wakad : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरटयांनी घरातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.

रामपाल इंदरमल सिंह (वय 59, रा. दत्तराज कॉलनी, पवारनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक तानाजी भोगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामपाल यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सुरु आहे. कामगार घरातूनच साहित्याची ने आण करत असल्याने त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता. दरम्यान, अनोळखी चोरट्याने कपाटातील साडे तीन तोळ्याचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने व इतर साहित्य असा एकूण एक लाख 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेले. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.