Pune : आपत्ती निवारणासाठी हॅम व कम्युनिटी रेडिओ उपयुक्त – सुजाता कोडग

0

एमपीसी न्यूज -मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनअर्स (आयईटीई) आणि पुणे हॅम रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि.14) आयोजित  रेडिओ दिन या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापनात रेडिओची भूमिका या  विषयावर सुजाता कोडग यांचे व्याख्यान झाले. यानिम्मित कोडग यांनी आपले मत मांडले.

स्थानिक पातळीवरील संवादासाठी कम्युनिटी रेडिओ खूप उपयुक्त ठरतो. आपत्ती व्यवस्थापन, तसेच आपत्ती टाळण्यासाठी हॅम व  कम्युनिटी रेडिओची भूमिका महत्त्वाची आहे. प्रबोधन, समुपदेशन, शिक्षण, संवाद यासाठी प्रभावी माध्यम म्हणून कम्युनिटी रेडिओचे महत्व आहे, असे सुजाता कोडग म्हणाल्या.

एखादी मोठी आपत्ती आल्यावर इतर सर्व यंत्रणा, नेटवर्क बंद पडतात. त्यावेळी हॅम व कम्युनिटी रेडिओ सुरू असतात. यांची मदत संकटकाळी होते तसेच मनोरंजन आणि माहितीपर कार्यक्रमाद्वारे प्रबोधन हि करता येते. या माध्यमाचा अधिकाधिक वापर व्हायला हवा. रेडिओच्या सहाय्याने नेमकी, खरी आणि अद्ययावत माहिती समजण्यास मदत होते, असे मत सुजाता कोडग यांनी यावेळी मांडले.

रेडिओ दिनानिम्मित आयोजित या कार्यक्रमास विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, शशी भाटे, दिपाली आकोलकर, विलास रबडे, डॉ. दत्ता देशकर, विश्वास काळे व हॅम श्रीपाद कुलकर्णी, आदी  मान्यवर उपस्थित होते. एरंडवणे आयईटीईच्या आवारात हा कार्यक्रम पार पडला. डॉ. दत्ता देशकर आणि  राजेंद्रकुमार सराफ यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. रेडिओ आता नामशेष होत आहे, असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतु अजूनही रेडिओ जिवंत आहे आणि तो नेहमीच राहील, असे मत डॉ.  देशकर यांनी व्यक्त केले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement