Handwriting Competition : जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन

एमपीसी न्यूज : अक्षर रसिक सुलेखन वर्ग आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 23 जानेवारी हा दिवस जागतिक हस्ताक्षर दिन म्हणून साजरा केला जातो. या स्पर्धेत सर्व वयोगटातील व्यक्तींना सहभागी होता येणार आहे.

यासाठी सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांनी भारताची प्रतिज्ञा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये लिहून पाठवायची आहे. उत्कृष्ट हस्ताक्षर असलेल्यास आकर्षक बक्षिसे व सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वहस्ताक्षरात लिहीलेली प्रतिज्ञा 30 जानेवारी 2021 पर्यंत 9881001790 या क्रमांकावर व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवायची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.