BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भोसरीत 21 ते 31 जानेवारी दरम्यान आरोग्य तपासणी

ओम हॉस्पिटलच्या वतीने आयोजन, संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांची माहिती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज -प्रजासत्ताक दिनानिमित्त भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने 21 ते 31 जानेवारी दरम्यान महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात सर्व गरजू रुग्णांची हृदयरोग आणि मधुमेहाची तपासणी तज्ञ डॉक्टारांकडून मोफत केली जाणार आहे. भोसरी, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरासोबत पुणे जिल्ह्यातील गरजूनीं या योजनेचा लाभ घ्यावा असे, आवाहन ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले आहे.

यावेळी डॉ. अग्रवाल म्हणाले की, एका सर्व्हेनुसार भारतात दरवर्षी अंदाजे 7 लाख 50 हजार व्यक्तींचा मृत्यू हद्यरोगाने होतो. तरुण वयातच मधुमेहामुळे हृदयरोग बळावतो. त्यामुळे योग्य वेळी मधुमेह आणि हृदयरोगाचे निदान होणे आवश्यक आहे. स्वास्थ भारत, सक्षक्त भारत, निरोगी व रोगमुक्त पुणे शहर ही संकल्पना समोर ठेवून 21 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित शिबीरात ओम हॉस्पिटलमध्ये मधुमेह आणि ई.सी.जी तपासणी करण्यात येईल. तसेच औषधोपचाराविषयी मोफत सल्लाही देण्यात येणार आहे.

बदलत्या जीवन शैलीमुळे मधुमेह आणि हृदयरोग रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे आरोग्यावर दुषपरिणाम होतो. म्हणूनच मधुमेहा सोबत हृदयरोगाचे वेळीच निदान होने आवश्यक असते, असे ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनिल अग्रवाल यांनी सांगितले. ओम हॉस्पिटल हे सी.जी.एच., सी.एस.एम.ए., पी.सी.एम.सी. धन्वंतरी, पी.एम.पी. एम.एल. तसेच सर्व मेडीक्लेम्स आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना करिता मान्यताप्राप्त आहे, अशी माहितीही अग्रवाल यांनी दिली. या आरोग्य शिबीराबात अधिक माहितीसाठी 7774049690, 7774049691, 7774049698 या नंबरवर संर्पक साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.