BNR-HDR-TOP-Mobile

PimpleSaudagar : नाना काटे सोशल फाउंडेशनच्यावतीने मोफत गोवर रुबेला लसीकरण मोहिम

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज -पोलिओ प्रमाणेच देशातून गोवर आणि रुबेला यांचेही उच्चाटन व्हावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली. आज (दि.२० जानेवारी) नाना काटे सोशल फाउंडेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालयात लसीकरण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, नगरसेविका शितल नाना काटे, डॉ. प्रफुल्ल तपशाळकर, सिस्टर कविता शिरसाठ, सिस्टर वर्षा पटसाळगे, दुर्गा थोटे आदी उपस्थित होते. दरम्यान, एक वर्ष ते १५ वर्षा दरम्यानच्या ३५० बालकांना बालकांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी मुलांना गोवर-रुबेला लस देण्यात आली तसेच मान्यवरांचे हस्ते मुलांना गोवर-रुबेला लस दिल्याचे ‘शासनाची प्रमाणपत्रे ’ देण्यात आली.

यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले की, गोवर-रुबेला या आजारांमुळे मुलांमध्ये कायमचा आंधळेपणा, बहिरेपणा तसेच मतिमंदता निर्माण होते़. या लसीकरणामुळे या दोन्ही आजारांपासून मुलांची मुक्तता होणार आहे़. तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांना ही लस द्यावी, असे आवाहनही काटे यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.