Pune News : प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवर 24 व 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर 58 प्रारूप प्रभाग रचनेबाबत प्राप्त हरकती व सूचनांवर 24 व 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून प्रारूप प्रभाग रचनेबाबत 3 हजार 596 हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुनावणीचे सविस्तर वेळापत्रक पालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या हरकतदारांना सुनावणी साठी उपस्थित रहायचे आहे त्यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून सुनावणी साठी उपस्थित रहावे असे पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर येथे सकाळी दहा वाजता हरकती सुनावणीला सुरूवात होणार आहे. प्रभाग व त्याच्या सुनावणीची वेळ याचे सविस्तर वेळापत्रक खालील प्रमाणे –

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.