Pimpri News : पिंपरी चिंचवडच्या विविध भागात जोरदार पावसाची सुरुवात

एमपीसी न्यूज : पिंपरी – चिंचवड शहराच्या विविध भागात जोरदार पावसाची सुरुवात झालेली आहे. आता संध्याकाळी 7.15 वा. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात जसे पिंपरी, चिंचवड इत्यादी  भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे.त्यामुळे रस्त्यावरुन पाणी वाहत आहे.

जोरदार पाऊस बरसत असल्याने दुचाकीस्वार रस्त्याचे कडेला झाडाखाली किंवा दुकानाच्याजवळ थांबून पाऊस थांबणायची वाट पाहत आहेत. तसेच आता सर्व गणेश मंडळांच्या इथे संध्याकाळची आरतीची वेळ झाली आहे.काही मंडळाच्या इथे आरती झाली आहे. तर काही ठिकाणी गणेश भक्त छत्री घेऊन, रेनकोट घालून आरतीसाठी आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.