Alandi : वादळी वाऱ्यासह आळंदी मध्ये मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथे दि.1जून rरोजी सायंकाळी साडेपाच सुमाऱ्यास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वारे मोठ्या प्रमाणात असल्याने वडगांव रस्त्यावर झाडे पडली. त्यापैकी एक झाड एका चारचाकी वाहनावर काहीसे पुढील भागावर पडले.त्यामुळे त्या वाहनाचे काहीश्या प्रमाणात नुकसान झाले.
वडगांव रस्त्यावरील वाहतूक ठप्प होती. त्या भागात तीन झाडे पडल्याची माहिती ज्ञानेश्वर जालिंदर कुऱ्हाडे यांनी दिली. मुसळधार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. अल्पशा प्रमाणात गारांचा पाऊस ही झाला.
सायंकाळी आळंदी शहरात अचानकपणे सुरू झालेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसाने वडगाव रस्त्यावर 3 झाडे उन्मळून पडली. यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते. याची दखल आळंदी नगरपरिषदने तत्काळ घेतली. व त्या घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल होत, जेसीबीच्या साहाय्याने ती पडलेली झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
दि.1 रोजी सायंकाळी आळंदी शहरात अचानकपणे सुरू झालेल्या जोरदार वादळी अवकाळी पावसाने वडगाव रस्त्यावर 3 झाडे उन्मळून पडली. यामुळे ट्रॅफिक जाम झाले होते.याची दखल आळंदी नगरपरिषदने तत्काळ घेतली. व त्या घटनास्थळी पालिकेचे कर्मचारी दाखल होत, जेसीबीच्या साहाय्याने ती पडलेली झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.त्यानंतर वाहतूक सुरळीत पणे सुरू झाली. याबाबत माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,प्रसाद बोराटे यांनी दिली.
https://youtu.be/mXlMtg2dukE