Pune News : लक्ष्मीनगरमध्ये घडले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन, पहिल्या दिवशी मुस्लिम तरुणाच्या हस्ते गणपतीची आरती

Hindu-Muslim unity in Laxminagar; Ganpati aarti by muslim young man on the first day.

एमपीसी न्यूज – पुण्यातील सर्वात मोठी गणेशमूर्ती (22 फूट) असलेल्या लक्ष्मीनगरचा राजा या  गणपतीची पहिली आरती एका मुस्लिम तरुणाच्या हस्ते पार पडली. श्री गणेशाच्या पहिल्या आरतीचा मान एका मुस्लिम तरुणाला देऊन पुण्यात हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडले. 

घरोघरी शनिवारी (दि.22) श्री गणेशाचे आगमन झाले. सार्वजनिक गणेशोत्सवावर काही प्रमाणात मर्यादा आल्यामुळे ठिक ठिकाणी साधेपणाने गणपती बाप्पांचे स्वागत करण्यात आले.

पुण्यातील लक्ष्मीनगरचा राजा या सर्वात मोठ्या गणपतीची असिफ शेख या मुस्लिम तरुणाच्या हस्ते पहिली आरती करण्यात आली व हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखं दर्शन घडवले.  लक्ष्मीनगरचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश जाधव व उपाध्यक्ष रोहित वाजे यांनी यासाठी पुढाकार घेत एक वेगळा उपक्रम राबवला.

याबाबत आपली भावना व्यक्त करताना असिफ शेख असे म्हणाले की, माझ्यासाठी लहानपणापासून गणेशोत्सव हा आनंदाचा क्षण राहिला आहे. धर्माने मुस्लिम असलो, तरी पुण्यात शिकत असताना पुणे विद्यार्थी गृह संस्थेने सर्वधर्म समभावाची शिकवण दिली.

आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाची आरती करायला मिळणे हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो.

पुण्यातील लक्ष्मीनगरचा राजा या मंडळाने एक वेगळा उपक्रम राबवत हिंदू मुस्लिम एकतेचे अनोखं दर्शन घडवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.