Hinjawadi : बांधकाम साईटवरून महागड्या कंपनीचे दोन लाखांचे नळ अज्ञातांनी चोरले

एमपीसी न्यूज – बांधकाम सुरु असलेली इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणून ठेवलेले महागड्या कंपनीचे 1 लाख 90 हजार 800 रुपये किमतीचे नळ अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 13) रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत सुसगाव येथे घडली.

संदीप भास्कर बडे (वय 37, रा. गांधीनगर झोपडपट्टी, नीता पार्क सोसायटी जवळ, येरवडा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुसगाव येथे ऑक्सफोर्ड पॅराडाईज सोसायटीचे काम सुरु आहे. या सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बसविण्यासाठी जॅग्वार कंपनीचे नळ आणले होते. ते नळ एका स्टोअर रूममध्ये ठेवले होते. फिर्यादी संदीप हे बांधकाम साईटवर नोकरी करतात. रविवारी संदीप बांधकाम साईटवरील स्टोअर रूममध्ये काम करत असताना एका मोपेड दुचाकीवरून आलेल्या दोघांनी स्टोअर रूममध्ये ठेवलेले 1 लाख 90 हजार 800 रुपये किमतीचे नळ चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.