-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri : दोन भावांच्या बनावट सह्या करून मिळकत हडपण्याचा भाऊ-बहिणींचा प्रयत्न; सहा जणांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – एक भाऊ बेपत्ता आहे. दुस-या भावाचा मृत्यू झाला आहे. असे असताना त्यांच्या बनावट सह्या करून ना हरकत प्रमाणपत्र बनवून त्याआधारे वडिलांची मिळकत परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 12 सप्टेंबर 2013 ते 3 नोव्हेंबर 2018 या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडला.

आशा राजेश सौदे (वय 45, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार आत्तरसिंग सौदे (वय 44), निर्मावती आत्तरसिंग सौदे (वय 60, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी), ज्योती विनोद लोधे (वय 33), विनोद लोहरीलाल लोधे (वय 37), संगीता नागेश नागरमोते (वय 49), योगेश हरिश्चंद्र नागरमोते (वय 49, सर्व रा. निगडी) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशा यांचे पती राजेश आत्तरसिंग सौदे यांचे 6 फेब्रुवारी 2011 रोजी निधन झाले. त्यापूर्वी राजेश यांचे भाऊ शिवकुमार आत्तरसिंग सौदे 2005 पासून बेपत्ता आहेत. आरोपी राजकुमार, निर्मावती आणि ज्योती हे फिर्यादी यांचे दीर आणि नणंद आहेत. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या बेपत्ता दीर आणि मयत पतीची बनावट सही करून ना हरकत प्रमाणपत्र बनविले. त्याआधारे फिर्यादी यांच्या सास-यांची मालमत्ता त्यांच्या सासूच्या नावावर करून ती परस्पर निगडी येथील संगीता नागरमोते यांना विकण्याचा कट रचला.

याबाबत आशा यांनी पोलिसात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.