Pune : बनावट चावीने कारचा दरवाजा उघडून चोरट्याने दीड लाखांची रोकड पळवली

एमपीसी न्यूज – बनावट चावीचा वापर करून कारच्या केबीनमध्ये ठेवलेली दीड लाखांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना काल बुधवारी (दि.23) दुपारी पावणे 3 च्या सुमारास कात्रज सुखसागर येथील बिकानेर स्वीट होम समोरील रोडवर घडली.

याप्रकरणी मुकुंद कांबळे (वय 50, रा. सुपर बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद यांनी दिवसभरात जमा झालेले दुधाचे एकूण 1 लाख 37 हजार रुपयांचे बिल कारच्या केबीनमध्ये ठेवले होते. त्यानंतर मुकुंद हे कार लॉक करून सुखसागर येथील बालाजी स्टोअर्स येथे दुधाचे बील घ्यायला गेले. दरम्यान, त्यांच्या कारचे दरवाजे अज्ञात चोरट्याने बनावट (डुप्लिकेट) चावीचा वापर करून उघडून बॅगेत ठेवलेली 1 लाख 37 हजारांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.