Hinjawadi : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करणा-या पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करणा-या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बावधन येथे घडली.

डॉली तेजपाल सोहेल (वय 47, रा. मालाड ईस्ट, मुंबई) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तेजपाल बाबुलाल सोहेल (रा. बावधन, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉली आणि आरोपी तेजपाल हे पती पत्नी असून त्यांच्यामध्ये 2009 पासून भांडण होत होते. तेजपाल हा डॉली यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच घरगुती कारणावरून वारंवार मारहाण व शिवीगाळ करीत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. यावरून डॉली यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आले नाही. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.