Hinjawadi :वेश्याव्यवसाय प्रकरणी महिलेवर गुन्हा; तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – आर्थिक फायद्यासाठी तीन महिलांकडून वेश्या (Hinjawadi)व्यवसाय करून घेणाऱ्या एका दलाल महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी हिंजवडी येथे ही कारवाई केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अंमलदार  (Hinjawadi)वैष्णवी गावडे यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेवर आरोपी महिलेने स्वतःची उपजीविका भागवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.