Maval: उप विभागीय कार्यालयात एकास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – मावळ मुळशी तालुका उप विभागीय अधिकारी कार्यालयात (Maval)एका शेतकऱ्याला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजता घडली.
मधुकर रतिकांत जगताप (वय 45, रा. देहूरोड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस (Maval)ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसरा तुषार नथू जगताप (वय 35), किसन दगडू जगताप (वय 90, दोघे रा. सांगवडे, ता. मावळ), दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune :रेस्टॉरंट, बार, हुक्का पार्लर रात्री 12.30 वाजेपर्यंत बंद करण्याचा पुणे ग्रामीण पोलिसांचा आदेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कौटुंबिक जमिनीच्या वादाची तारीख असल्याने मंगळवारी बावधन येथील मावळ मुळशी तालुका उप विभागीय अधिकारी कार्यालयात गेले होते. तिथे आरोपींनी त्यांना दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. जमिनीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.