Alandi: एमआयटी महाविद्यालय मध्ये क्षितिज 2024 वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात साजरे

एमपीसी न्यूज – विद्यार्थांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात (Alandi)क्षितिज 2024  वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले . या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यअभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व आयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाल्यामु‌ळे विद्यार्थांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यत आले.
यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्य, निर्मितीतील प्रसंग व राज्यअभिषेक (Alandi)सोहळा याचे सादरीकरण करण्यात आले, व राम चरित्र्य, व रामायणातील काही प्रसंग याचाही समावेश स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात होता. प्रथम दिवसाचे उदघाटन प्रसिध्द गायक ‘ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले. या प्रसंगी त्यांनी झेंडा, व संत तुकाराम या चित्रपटातील गाणे गावून त्यांनी विद्यार्थांचे  मनोरंजन केले.

 

दुसऱ्या दिवसाचे उद्घाटन चाणक्य मंडळ प्रमुख व  निवृत्त सनदी अधिकारी  ‘अविनाश धर्माधिकारी’ यांनी केले. या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान व नोकरीतील आव्हाने यांना कसे समोरे जायचे याचे पाच मंत्र सांगितले.

क्षितिज 2024 वार्षिक स्नेहसंमेलनातं  उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (MASCOT) , उत्कृष्ट शैक्षणिक विभाग ,  उत्कृष्ट शिक्षक व  उत्कृष्ट शिक्षेकेत्तर कर्मचारी पुरस्कार देण्यात येतात  या वर्षातील उत्कृष्ट शैक्षणिक विभाग पुरस्कार   बीबीए आणि बीबीए(आयबी) विभागाला  व उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार  प्रा.संगीता बोरडे,   उत्कृष्ट  शिक्षेकेत्तर कर्मचारी पुरस्कार   दिपाली जोगदंड यांना देऊन सन्मानीत करण्यात आले व उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार (MASCOT)  हा मृणाली शिंदे आणि मुस्कान शर्मा या विद्यार्थांना  देऊन   सन्मानित करण्यात आले.

 

Pune :रेस्टॉरंट, बार, हुक्का पार्लर रात्री 12.30 वाजेपर्यंत बंद करण्याचा पुणे ग्रामीण पोलिसांचा आदेश

यांनी  क्षितिज 2024 चे  समन्वयक डॉ शरद कदम व  सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्रा. अरविंद वागस्कर, प्रा.अमित ताले यांनी प्रमुख  भूमिका बजावली.   महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. बी. बी वाफारे, तसेच उपप्राचार्य अक्षदा कुलकर्णी व  उपप्राचार्य डॉ. मानसी अतितीकर, कुलसचिव संदीप रोहीनकर तसेच  सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्यातून  दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात साजरे करण्यात आले. याबाबत माहिती राहुल बाराथे यांनी दिली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.