Pimpri: जुन्या भांडणाच्या कारणावरून एकास मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एकास (Pimpri)मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 6) रात्री अकरा वाजता रमाबाई नगर, पिंपरी येथे घडली.
रोहित शरद गाडे, शरद गाडे (दोघे रा. रमाबाई नगर, पिंपरी) अशी (Pimpri)गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वसंत साहेबराव गायकवाड (वय 39, रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड आणि आरोपी यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. त्या वादाच्या कारणावरून आरोपी रोहित याने फिर्यादीस लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर मारून गंभीर जखमी केले. शरद गाडे याने फिर्यादी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.