Pune: Mngl ने CNG च्या किंमती केल्या कमी 

एमपीसी न्यूज – MNGL ने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव, (Pune)चाकण, हिंजवडी भागात 5/6 मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून CNG च्या किंमती कमी केल्या आहेत. 
सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पिंपरी-चिंचवड आणि चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांसह पुणे शहरातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) च्या किरकोळ विक्री किंमतीत कपात केली आहे.
जे 5/6th मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून लागू होत आहेत.  सीएनजीच्या दरात रु. 2.50/- प्रति किलोग्रॅम प्रमाणे (करांसह) कपात करण्यात आली आहे.. सीएनजी किरकोळ विक्री किंमत रु. 86.0/- प्रति किलो वरून रु. 83.50/- प्रति किलो करण्यात आली आहे.
 कपातीनंतर , MNGL चे पुणे शहरातील CNG, पेट्रोलच्या तुलनेत प्रवासी कार विभागासाठी सुमारे 50% आणि डिझेलच्या तुलनेत सुमारे 30% ची आकर्षक बचत देते आणि ऑटोरिक्षांसाठी सुमारे 30% पेक्षा जास्त बचत देते.

 

Alandi: एमआयटी महाविद्यालय मध्ये क्षितिज 2024 वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात साजरे

26 जानेवारी, 2024 पासून, देशात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यासाठी सरकार आणि Regulatory Body नि दिलेल्या प्रायोरिटी वर , CGD कंपनींद्वारे देशभरात ‘राष्ट्रीय PNG ड्राइव्ह’ हाती घेण्यात आला आहे.
या संदर्भात, MNGL ने 14.02.2024 पासून देशांतर्गत घरगुती गॅस च्या किमती कमी केल्या. आणि आता काही दिवसांपासून डोमेस्टिक PNG साठी नवीन नोंदणी आणि वापर वेगाने होत आहेत. पीएमसी आणि पीसीएमसी क्षेत्रातील ग्राहकांमध्ये नैसर्गिक वायू वापरा बद्दल सकारात्मकता विकसित झाली आहे.
 MNGL ने अंतिम ग्राहकांमध्ये पसंतीचे इंधन म्हणून CNG ची सकारात्मकता आणि आकर्षकता निर्माण करण्यासाठी ही CNG किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
MNGL पुण्यासह 6 वेगवेगळ्या भौगोलिक भागात CGD प्रकल्प चालवत आहे आणि सगळीकडे CNG च्या किमती रु. 2.50/- प्रति किलोग्राम ने कमी केल्या आहेत. 2.50/- प्रति किलोग्राम या सर्व करांसह.
https://www.youtube.com/watch?v=xuetkF0jsmg&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.