Hinjawadi : सावधान… दुचाकीस्वाराला लुटण्यासाठी दगड फेकीचाही प्रयोग!!!

एमपीसी न्यूज – आत्ता पर्यंत कधी कोयत्याचा धाक (Hinjawadi) दाखवून, कधी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, कधी लिफ्ट देणे किंवा घेण्याच्या बहाण्याने लुटमार होत असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, हिंजवडी येथे चक्क चालत्या गाडीला दगड मारून दुचाकीस्वाराला खाली पाडत चोरट्यांनी मोबाईल व गाडी दोन्ही चोरून नेले आहे. हा धक्कादायक प्रकार हिंजवडी फेज -3 येथे शनिवारी (दि.25) रात्री उशीरा घडला.

याप्रकरणी वैभव वाघजी बेले (वय 18, रा.मुळशी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा हाऊस किपींगचे काम करतो. शनिवारी रात्री कामावरून जाताना मित्राच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी तो दुचाकीवरून हिंजवडी फेज तीन येथील फाऊंटन मार्केट येथील यु 57 या सोसायटी समोर दोन अनोळखी माणसांनी फिर्यादी यांच्या गाडीवर दगड मारला.

Khed : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाला लुटले

यावेळी अचानक झालेल्या दगडफेकीमुळे फिर्यादी याचा (Hinjawadi) तोल जावून तो खाली पडला. फिर्यादी खाली पडताच फिर्यादीचा 5 हजार रुपयांचा मोबाईल व 5 हजार रुपयांची चालू दुचाकी असा एकूण 10 हजार रुपायांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले.

या साऱ्या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी यांनी रविवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र हि घटना छोटी दिसत असली तरी या लुटमारीच्या प्रकारात मोठा अपघात होऊन जिवीत हानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या साऱ्या प्रकारांना जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे.

चैन स्नॅचींग पाठोपाठ दुचाकीस्वार किंवा पायी जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रमाण पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत आहे. वेळीच गुन्हेगारांवर कारवाई झाली नाही तर चार-दोन हजारांच्या फोनसाठी एखाद्याला आपला जीव देखील गमवावा लागू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.