Hinjawadi : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज – लग्नाचे वचन देत महिलेवर वारंवार शारीरिक (Hinjawadi) अत्याचार केले. तसेच विश्वास संपादन करत 6 लाख रुपयांची आर्थिक फसणूक देखील करण्यात आली आहे. हा प्रकार 9 सप्टेंबर 2019 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी, काळेवाडी व मारुंजी येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सिद्धार्थ त्रिपाठी (वय 38, रा.मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hinjawadi : सावधान… दुचाकीस्वाराला लुटण्यासाठी दगड फेकीचाही प्रयोग!!!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ याने फिर्यादी महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर कुणाला काहीही सांगू नको, मी तुझ्याशी लग्न करतो म्हणत त्याने महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

महिला गरोदर राहिली असता तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात (Hinjawadi) केला. सन 2016 ते 28 डिसेंबर 2022 या कालावधीत त्याने फिर्यादीकडून सहा लाख रुपये घेतले. ते पैसे परत न करता तिचा विश्वासघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.