Hinjawadi crime News : बनावट चावीने घरफोडी; 81 ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले, चोरटा अटकेत

एमपीसी न्यूज – बनावट चावीच्या साहाय्याने घरफोडी करून 81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेणा-या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. घरफोडीची घटना ऑक्टोबर 2019 ते 4 जानेवारी 2020 या कालावधीत वाकडकरवस्ती रोड, वाकड येथे घडली. याबाबत सोमवारी ( दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमनाथ अरुण भुसारे (वय 25, रा. वाकाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत भीमराव रामचंद्र काळे (वय 42, रा. वाकडकर वस्ती रोड, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2019 ते 4 जानेवारी 2020 या कालावधीत फिर्यादी काळे त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.

दरम्यानच्या कालावधीत आरोपी सोमनाथ याने बनावट चावीच्या साहाय्याने काळे यांचे घर उघडले. घरातून दोन लाख 80 हजार रुपये किमतीचे 81 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सोमनाथ याला अटक करण्यात आली आहे.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.