-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi Crime News : हिंजवडीतील मरीन ड्राइव्ह हॉटेलमधील हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वाकड हिंजवडी रोडवर असलेल्या मरीनड्राइव्ह हॉटेलमधील हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 18 हजार दोनशे रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) रात्री करण्यात आली.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

अक्षय रामदास जमदाडे (वय 28, रा. भुजबळवस्ती, वाकड), अनिल मोहनलाल मीना (वय 25, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), दत्ता प्रकाश सानप (वय 22, रा. हिराई सिताई रोड, हिंजवडी), किरण गोविंदराव सूर्यवंशी (वय 23, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), दत्ता प्रल्हाद सोनवणे (वय 20, रा. श्रीनाथनगर, हिंजवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई रवी पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड-हिंजवडी रोडवर असलेल्या मरीन ड्राईव्ह हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारुन कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी पाच हुक्का पाॅट, पाच हुक्का पाईप, पाच हुक्का फ्लेवर आणि रोख रक्कम असा एकूण 18 हजार 200 रुपयांचा माल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.