Hinjawadi Crime : हिंजवडीत भरदिवसा तीन मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज – खोलीतून चोरट्याने तीन मोबाईल फोन आणि पार्किंग मधून दुचाकी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास( Hinjawadi Crime) अवघ्या सहा मिनिटात श्रीराम चौक, मारुंजी रोड, हिंजवडी येथे घडली.

रणजित रवींद्र भोसले (वय 22, रा. श्रीराम चौक, मारुंजी रोड, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune-Loanvala local : पुणे-लोणावळा लोकल खाली येवून एकाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खोलीतून एका अनोळखी चोरट्याने 50 हजारांचे तीन मोबाईल फोन आणि एक दुचाकी चोरून नेले.(Hinjawadi Crime) ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याने ही चोरी अवघ्या सहा मिनिटात केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.